News

Realme X And Realme 3i Mobile Launc in India !

भारतातील अव्वल दर्जाचा उदयोन्मुख स्मार्टफोन ब्रॅंड रीअलमीने आज ‘रीअलमी X’ आणि ‘रीअलमी 3i’ ही आपली दोन नवीन मॉडेल्स बाजारात दाखल केली. ही नवी मॉडेल्स डिझाइन, कामगिरी आणि दर्जा या तिन्ही बाबतीत ग्राहकांच्या अपेक्षांना पुरून उरणारी आहेत. रीअलमी Xची रचना अत्याधुनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट तंत्रज्ञानाने सुसज्ज असून ग्राहकांना अत्यंत वाजवी दरातील, खराखुरा फुल व्ह्यू अनुभव देण्याच्या दृष्टीने करण्यात आली आहे. या फोन मध्ये ६.५३ इंचाचा एफएचडी+नॉचलेस सुपर एएमओएलईडी डिस्प्ले आहे. यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५चं सुरक्षाकवच असून पोलर व्हाइट आणि स्पेस ब्ल्यू अशा दोन रंगांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध असेल. मागील बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप असून यातील एक कॅमेरा ४८ मेगापिक्सल आणि दुसरा ५ मेगापिक्सलचा आहे. कॅमे-यात सोनी आयएमएक्स ५८६ सेंसरचा वापर करण्यात आलाय. सेल्फीसाठी या फोनमध्ये सोनी आयएमएक्स ४७१ सेंसरसह १६ मेगापिक्सलचा एआय पॉप-अप सेल्फी कॅमेरा आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रैगन ७१० एआयई प्रोसेसर आहे.

Realme X And Realme 3i Mobile Launc in India !

रीअलमी 3i  या स्मार्टफोनमध्ये ६.२२ इंचाची ड्यूड्रॉप फुल स्क्रीन आहे. डायमंड-कट डिझाइनसह असलेला हा स्मार्टफोन डायमंड ब्ल्यू, डायमंड रेड, डायमंड ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल. यात ४,२३० एमएएच क्षमतेची बॅटरी असून एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर सलग ११ तास पबजी खेळता येणं शक्य आहे, याशिवाय २१ तास ब्राऊझरवर इंटरनेटचा वापर आणि १३ तास युट्युबचा वापर करता येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असून मागील बाजूला एआय ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यातील एक कॅमेरा १३ मेगापिक्सल तर दुसरा कॅमेरा २ मेगापिक्सलचा आहे.

Realme X And Realme 3i Mobile Launc in India !

रीअलमी 3i स्मार्टफोनमध्ये एआय फेशियल आणि फिंगरप्रिंट अनलॉक फीचर आहे. हा स्मार्टफोन दोन रॅम व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. यातील ३जीबी रॅम+३२जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत ७ हजार ९९९ रुपये आहे, तर ४जीबी रॅम+६४जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे. रीअलमी X ४जीबी रॅम+१२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत १६ हजार ९९९ रुपये, तर ८जीबी रॅम+१२८जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे. फ्लिपकार्ट आणि रीअलमीडॉटकॉम  या संकेतस्थळावर हे फोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. २४ जुलै दुपारी १२ वाजेल्यापासून रिअलमी X स्मार्टफोनसाठी सेल आयोजित करण्यात आला आहे. तर रिअलमी 3i स्मार्टफोनसाठी २३ जुलै रोजी दुपारी १२ वाजल्यापासून पहिला सेल आयोजित करण्यात आला आहे.

Realme X And Realme 3i Mobile Launc in India !

 

Realme X And Realme 3i Mobile Launc in India !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker